PM Kisan Yojana 19th हप्ता : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे नाव यादीत आहे की नाही, ते आधी तपासा. जर नाव नसेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देते. ही रक्कम थेट (DBT) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळतात. आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत, आणि आता 19 व्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे.
सरकारने या योजनेसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार, काही शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
काही शेतकरी वंचित का राहू शकतात?
जर तुम्ही सरकारच्या नवीन नियमांचे पालन केले नाही, तर 19 वा हप्ता जमा होणार नाही. योजनेतील लाभार्थींनी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊ शकता.
जर अर्ज भरताना चूक झाली असेल, बँक खात्याचा चुकीचा क्रमांक दिला असेल किंवा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल, तर तुमचा हप्ता थांबवला जाईल. त्यामुळे तुमची माहिती वेळेत तपासा आणि दुरुस्त करा.
eKYC कसे करावे?
- ओटीपी (OTP) आधारावर ई-केवायसी – पीएम किसान पोर्टल किंवा मोबाइल अॅपवर करा.
- बायोमेट्रिक ई-केवायसी – तुमच्या जवळच्या CSC/SSK केंद्रावर करा.
- फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी – मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक
- टोल फ्री क्रमांक: 18001155266
- लँडलाईन क्रमांक: 011-23381092, 011-23382401
- हेल्पलाईन क्रमांक: 155261, 18001155266
- नवीन हेल्पलाईन क्रमांक: 011-24300606
शेतकऱ्यांसाठी सूचना
तुमची सर्व माहिती योग्य आणि अपडेट ठेवा. अर्जात काही चूक असेल, तर ती लवकरात लवकर सुधारून घ्या. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि खात्याशी आधार जोडल्याची खात्री करा. यामुळे 19 वा हप्ता वेळेत मिळू शकतो.
शेतकऱ्यांनी ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही.