मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ मंगळवारपासून सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत एकूण २ कोटी ३४ लाख बहिणींना लाभ मिळणार आहे. पहिल्या दिवशी ६७ लाख बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत पैसे मिळतील, असे सांगण्यात आले आहे.
ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली होती. यासाठी राज्यभरातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते, त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. काही बहिणींची बँक खाती आधार कार्डशी जोडलेली नसल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी लाभ मिळाला नाही. ऑक्टोबर महिन्यात २ कोटी ३४ लाख पात्र बहिणींना प्रत्येकी ७५०० रुपये जमा करण्यात आले होते, ज्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे होते.
डिसेंबरच्या लाभासाठी सरकारने १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी खातेवाटप पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरचा लाभ वेगाने देण्यास सुरुवात केली.
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज मिळणार जानेवारी-डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये
नव्या लाभार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर, योजनेत पात्र ठरलेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींची बँक खाती आधारशी जोडली गेली नाहीत. त्यामुळे त्यांना याआधी लाभ मिळालेला नव्हता. आता या बहिणींच्या बँक खात्यात सहा महिन्यांचे एकूण ९,००० रुपये जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरली. या योजनेमुळे राज्यातील अनेक बहिणींनी महायुतीला मतदान केले, ज्यामुळे त्यांना मोठे यश मिळाले.