या महिला होणार योजनेतून अपात्र; चेक करा यादीत नाव Ladki Bahin Yojana

By admin

Published On:

Follow Us

Ladki Bahin Yojana राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दोन कोटी ४७ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सध्या या योजनेच्या लाभासाठी 2 कोटी 47 लाख महिलांनी पात्रता मिळवली आहे. मात्र, काही अर्जांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सरकार त्या अर्जांची तपासणी करणार आहे.

योजना जाहीर झाल्यानंतर सुमारे 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यातील बहुतेक अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र, सरकारला यासाठी दरमहा सुमारे 3,870 कोटी रुपयांचा खर्च येतो, आणि हा खर्च वाढल्यास तो 65,000 कोटी रुपये होऊ शकतो, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येतो.

Ladki Bahin Yojana योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम ठरवले आहेत. जसे की:

  1. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
  2. कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
  3. लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसावी किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावेत.
  4. एका कुटुंबातील दोन महिलांपेक्षा जास्त अर्ज नसावेत.
  5. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती नसावी.

योजना लागू करताना आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जुळणे आवश्यक आहे. जर माहिती चुकीची असेल, तर अशा अर्जदारांना योजना लाभ मिळणार नाही. काही महिलांनी तक्रारी केल्याने सरकार त्या अर्जांची पुन्हा पडताळणी करत आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांनी योग्य निकष पूर्ण केले आहेत त्यांना हा लाभ मिळत राहील. तसेच, या योजनेच्या अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारने तक्रारींच्या आधारे पडताळणीचे नियोजन केले असून, उत्पन्न, चारचाकी वाहन, आणि सरकारी नोकरीशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. ज्या महिलांनी अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाईल.

सध्या योजना व्यवस्थित सुरू आहे, आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत सहा हप्त्यांमध्ये प्रत्येकी 9,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत महिलांना मिळालेला लाभ कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नाही, असे मंत्री महोदयांनी सांगितले आहे.Ladki Bahin Yojana

admin

Leave a Comment